उदकशांत

Share Post On:

उदकशांती म्हणजे काय ? उदक म्हणजे पाणी अभिमंत्रित केलेल्या पाण्याने घराची शुद्धी,शांती करणे याला उदकशांती असे म्हणतात. दैनंदिन जीवनामध्ये पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच आपल्या शरीरामधेपण 70 टक्के पाणी आहे आणि पाण्याचा समतोल (बॅलन्स) बिघडला तर अनेक आजारांना तोंड द्यावे लागते,उदकशांती द्वारे पाण्याचा समतोल साधणे  हा पण एक  विचार आहे. शास्त्रांमधे आपो वै सर्वा देवताः अस म्हटलेलंच आहे म्हणजे पाण्यामधे सर्व देवता आहेत असा त्याचा अर्थ.

 – उदकशांत कधी करावी –

 घर घेतल्यावर आणि वास्तुशांतीचा मुहूर्त उशिरा असल्यास वा घरामध्ये रंगकाम फर्निचर चे काम चालू असल्यास,गृहप्रवेश पूजेसोबत उदकशांती करून रहायला जायला हरकत नाही पण वास्तुशांती च्या मुहूर्तावर वास्तुशांत अवश्य करावी.

हे माहिती प्रशांत गुरुजी यांच्या लेखातून पुढे वाचा.. तसेच व्यवसाय, दुकान यामधे अपेक्षित यश मिळत नसेल, बाहेरचा त्रास आहे असे वाटत असेल किंवा नोकरी,धंद्यामध्ये अपेक्षित यश मिळावे, घरांमध्ये सकारात्मक,चांगले वातावरण कायम टिकून रहावे  ई.साठी उदकशांती करावी. स्थलद्धीसाठी वास्तुशांती सोबत उदकशांत करावी  व वास्तुशांत झाल्यावर सुद्धा दरवर्षी आपल्या वास्तूसाठी उदकशांत करावी.

 – उदकशांती विधी –

सुरुवातीला  यजमानांना शरीरशुद्धीसाठी पंचगव्य दिले जाते, पंचगव्य म्हणजे गायीपासून निर्माण झालेले पाच पदार्थ जसे की गोमुत्र,  गोमय, दूध, दही, तूप याला पंचगव्य असे म्हणतात. यजमानांनी कपाळी कुंकुमतिलक धारण करून, देवाला विडा नारळ ठेवून, देवाला, मोठी माणसं,गुरुजी यांना नमस्कार करून आसनावर बसावे, प्रथम पंचांगाचा उल्लेख केला जातो, तिथी वार नक्षत्र करण योग याला पंचांग असे म्हणतात, सोबतच संकल्प केला जातो. संकल्प म्हणजे ज्या कारणासाठी उदकशांती करतोय त्याला संकल्प असे म्हणतात. प्रथम गणपतीपूजन केले जाते. ( ही माहिती प्रशांत मुंडले गुरुजी यांच्या लिखाणामधून )नंतर मुख्य देवतेच्या स्थापनेसाठी गुरुजींना वर्णी दिली जाते, थोडक्यात मुख्य देवतेच्या स्थापनेसाठी गुरुजींना निमंत्रण देणे याला वर्णी असे म्हणतात.

नंतर गुरुजी यजमानांच्या नाव, गोत्राचा उल्लेख करून, न्यास करून, कलश, शंख, घंटा, दीप पुजन करतात.  संपूर्ण घरात धूप,पिवळी मोहरी, पंचगव्य, शुद्धोदक प्रोक्षण करून,घराची शुद्धी करतात. नंतर गव्हाचे किंवा वाळूचे  स्थंडिल(चौकोन) करून  त्यामधे कलश स्थापन केला जातो व त्यावर ब्रह्मदेवाची स्थापना पूजा केली जाते. कलशाला दर्भाने अच्छादन (झाकला) केले जाते. नंतर चार दिशेला चार गुरुजी बसून कलशाला दर्भ लावून मंत्र पठण करतात( कलश अभिमंत्रित करतात). दर्भ हे मंत्र वाहक आहेत त्यामुळे  दर्भाला फार महत्त्व आहे. शेवटी कलशामधल्या अभिमंत्रित पाण्याने सर्वांवर अभिषेक केला जातो. कर्माची सांगता म्हणून गुरुजींना द्रव्यद्वारा गो प्रदान दिले जाते. गुरुजी मंत्र पठण करत यजमानांना नारळ, फळे, तांदूळ यांचा आशीर्वाद स्वरूप देतात शेवटी तीर्थप्रसाद दिला जातो व कर्माची सांगता होते.

 प्रशांत मुंडले गुरुजी

काॅल-व्हाटसअप – 9175869813

©️लेख प्रशांत गुरुजी


Share Post On:
error: Content is protected !!