सत्यनारायण पूजा
- Book Pandit for Satyanarayan Puja
- सत्यनारायण पूजेची कथा ?
- सत्यनारायणाची पूजा कधी करावी ?
- सत्यनारायण पूजा कशी करावी ?
- षोडषोपचार पूजा
प्रथम आपण सत्यनारायण पूजेची कथा समजून घेऊ. नारदमुनींना ज्यावेळी भूतलावर फिरत असताना लोक द:खी कष्टी आहेत असे दिसले तेव्हा ते वैकुंठामधे गेले. तिथे त्यांनी महाविष्णुंना विचारले की भूतलावरती लोक द:खी कष्टी आहेत त्यांचे दु:ख नाहिसे करण्याचा एखादा उपाय सांगावा . त्यावर महाविष्णु म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णु सर्वांच्या सर्व ईच्छा पूर्ण करुन, मनातील इच्छित फळ प्राप्त करून देणारा आहे. सत्यनारायणाच्या पूजेने इच्छित फलप्राप्ती मिळते, म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन करावे अस विष्णूंनी नारदांना सांगितले अशी ही थोडक्यात कथा आहे ( ©️लेख प्रशांत मुंडले गुरुजी ) सत्यनारायणाची पूजा कधी करावी ते पाहू.-
पंचांगामध्ये शुभ दिवस पाहून सकाळी किंवा प्रदोष काळी पंचामृत, शिर्याचा प्रसाद, तुळस अर्पण करून सत्यनारायणाची यथासांग पूजा करावी.
आता आपण पूजा कशी करावी ते बघुया. प्रथम आचमन,प्राणायाम करावे नंतर कपाळी कुंकुमतिलक धारण करावे. देवांना विडा, नारळ ठेवावा, देवाला, मोठी माणस, गुरूजींना नमस्कार करावा व आसनावर बसावे. सुरवातीला गुरूजी पंचागाचा उल्लेख करतात. पंचांग म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, करण, योग याला पंचांग असे म्हणतात. नंतर संकल्प केला जातो म्हणजे ज्या कारणासाठी मी सत्यनारायणाची पूजा करतोय त्याला संकल्प असे म्हणतात. नंतर सुरवातीला पूजा निर्विघ्नपणे व्हावी म्हणून गणपताचे पूजन केले जाते. कलषावरती नवग्रह स्थापना पूजा होते. सत्यनायणाची स्थापना व पंचामृताने अभिषेक, विष्णुसहस्रनामावलीने तुळशी वाहिल्या जातात .
अशाच प्रकारे विविध उपचाराने षोडशोपचारे पूजा केली जाते. षोडषोपचार पूजा म्हणजे – आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान,वस्त्र, उपवस्त्र,गंध,फुल,धुप,दीप ,नैवेद्य प्रदक्षिणा, नमस्कार ,मंत्रपुष्पांजली याला षोडषोपचार पूजा असे म्हणतात. नंतर सत्यनारायणाच्या पोथीची पूजा होते. गुरुजींना गंध फूल देऊन नमस्कार करावा सत्यनारायणाची कथा ऐकावी. शेवटी सत्यनायणाची आरती व तीर्थप्रसाद देऊन सत्यनारायण पूजेची सांगता होते. आपल्या बंधू,बांधवांसहित अशा प्रकारे सत्यनारायणाची पूजा नेहमी करावी.
सत्यनारायण पुजा तसेच इतर कोणत्याही पूजेसाठी, ज्योतिष मार्गदर्शनासाठी आजच गुरुजींना संपर्क करा. Contact today to Book pandit for satyanarayan puja. Follow us for more information about other Puja, shanti and for astrological guidance. ©️ लेख: प्रशांत मुंडले गुरुजी
Book pandit for satyanarayan puja- अजून वाचा