आमच्याबद्दल

परिचय

नमस्कार माझे नाव प्रशांत मुंडले गुरुजी, माझे वेदाध्ययन आळंदी येथे झाले आहे.गुरुजी जंक्शन मार्फत आम्ही विविध ठिकाणी देशात व परदेशात सुद्धा विविध पूजा जसे की वास्तुशांत, नवचंडीयाग , प्राणप्रतिष्ठा , शांतीकर्म, सर्व संस्कार,सर्व प्रकारच्या पूजा ई. शास्त्रोक्त पद्धतीने करतो, त्या त्या पूजांची व्यवस्थितरीत्या माहिती सांगितली जाते, जेणेकरून समोरच्याला आपण जी पूजा करत आहोत त्याबद्दलची माहिती मिळाल्याने आत्मिक समाधान ही मिळते.आता आपण महत्त्वाच्या पूजा, मंत्र, संस्कार याबद्दल माहिती पाहू.

मंत्र हे देवतांच्या अधीन असल्यामुळे मंत्राचे उच्चारण, गती, लयबद्धता ही महत्त्वाची आहे आणि तरच ते मंत्र देवतांपर्यंत पोहोचतात व त्या पूजेची,शांतीकर्माची फलप्राप्ती मिळत असते तसेच जी काही आपण पूजाअर्चा, शांतीकर्म करतो त्यासाठी योग्य दिवस, मुहुर्त बघणे ही आवश्यक असते जसे की वास्तुशांत जर करायची असेल तर फक्त रविवारी सुट्टी आहे म्हणून करता येत नाही कारण रविवार आणि मंगळवार या दिवशी वास्तुशांतीचे मुहूर्त नसतात. गृहप्रवेश, प्राणप्रतिष्ठा, नवचंडी याग विविध शांती, काही संस्कार ई. पूजा, शांतीसाठी सुद्धा मुहूर्त आवश्यक असतो कारण पंचांग कर्त्यांनी गणितीय पद्धतीने वास्तुशांतीसाठी, विवाहासाठी, मुंजीसाठी, शांतीकर्मासाठी, संस्कारा साठी, मुहूर्त काढलेले असतात,जेणेकरून त्या त्या कर्माचे फळ ते कर्म करणार्‍या व्यक्तीला मिळावे. बऱ्याच वेळा अस दिसत की लग्नाच्या मुहूर्तावर लग्न लागतच नाही विवाह, लग्न हा आपल्या आयुष्याती षोडश संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार आहे आपल्या जीवनात विवाह (लग्न) संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून लग्न हे मुहूर्तावरच लागलं पाहिजे तसेच मुंजीचा (उपनयन) सुद्धा मुहूर्त साधला गेला पाहिजे. विवाहामध्ये बऱ्याच वेळा वर – वधू पक्षाकडील मंडळींकडून कार्यालयात लग्न ठिकाणी यायला उशीर होतो त्यामुळे विधी उशिरा सुरु होतात त्यामुळे मुहूर्तापर्यंत विधी पूर्ण व्हायला वेळ कमी राहतो आणि घाई होते त्यामुळे लग्न विधी हे वेळेत सुरू व्हायला हवेत म्हणजे विधी व्यवस्थित होतात.

यज्ञा विषयी माहिती पाहू आपण जे वेगवेगळे यज्ञ, याग, शांती करतो यज्ञ अंगभूत जे होम-हवन करतो त्यासाठी सुद्धा विटांचे स्थंडील,यज्ञकुंड असावे लोखंडी पात्र नसावे कारण शास्त्रामध्ये लोखंड हे वर्ज्य सांगितले आहे शिवाय विटांच्या यज्ञकुंड तयार करून,शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढली जाते व अशा यज्ञकुंडामधे होमहवन केल्याने आत्मिक समाधान ही मिळते. तात्पर्य एवढेच की आपण कर्म करत असताना पद्धतशीरपणे,मनापासून ते ते कर्म झाल्यास त्याची फलप्राप्ती निश्चितच मिळत असते वर नमूद केल्याप्रमाणे कोणतेही पूजाकर्म संस्कार व्हावेत असा आमचा आग्रह असतो व गुरुजी जंक्शन या आमच्या ग्रुपच्या माध्यमातून अशाच प्रकारे विविध ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा,अर्चा,शांतीकर्म होत असतात. कोणतीही पूजा, वास्तुशांत,जननशांत, विविध शांती, लग्न,मुंज, विविध संस्कार, ई.साठी जरूर संपर्क करा. धन्यवाद